मोशीमध्ये दगडाने ठेचून एकाचा खून

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मोशीमध्ये दगडाने ठेचून एकाचा खून

   मोशी , (प्रबोधन  न्यूज )  -   मोशी येथे   दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना सोमवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी मधील मातेरे हाउसच्या समोर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोकळ्या मैदानात एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याचे दिसले.

बाह्यांगावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. दगडाने अथवा कठीण वस्तूने मारल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.

दरम्यान, मृताची ओळख पटविण्यापासून ते आरोपी पकडण्या पर्यंत पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.