राहुल गांधींचा गोवा दौरा; मोटरसायकलवर केला बेम्बोलिम ते पणजी प्रवास

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राहुल गांधींचा गोवा दौरा; मोटरसायकलवर केला बेम्बोलिम ते पणजी प्रवास

पणजी -

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी गोव्यात एकाप्रकारे निवडणुकीच्या प्रचारासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बेम्बोलिमहून चक्क मोटरसायकलवर पणजीच्या आझाद मैदानावर पोहोचले. तेथे त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले. यासाठी राहुल गांधीनी बेम्बोलिम या ठिकाणाहून पणजीपर्यंतचा प्रवास दुचाकीने केला.

राहुल यांनी हेल्मेट घालून तसेच मास्क लावून मोटरसायकलच्या पाठीमागे बसत प्रवास केला. राहुल यांचा व्हिडिओ काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतांना दिसत आहे. राहूल यांनी यादरम्यान वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. तसेच गोव्यातील अनेक मासेमारी करणाऱ्यांची देखील त्यांनी भेट घेतली, काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तुमच्या समस्या दूर करण्यात येतील असे आश्वासन देखील राहुल यांनी दिले.

पणजीपर्यंत मोटरसायकलवर प्रवास

गोवा विधानसभेचा कार्यकाळ 2021 च्या सुरुवातीला संपणार आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष सध्या गोव्याचा दौरा करत आहे. राहुल गांधी यांनी देखील पणजीच्या आझाद मैदानापर्यंत चक्क मोटरसायकलच्या पाठीमागे बसून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे प्रवास केला आहे. सोबतच राहूल यांनी केंद्र सरकारने वाढवलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर देखील भाष्य केले आहे.

युपीए सरकारच्या काळी कच्चे तेल महागले होते

राहुल यांनी पेट्रोल-डिझेलच्या मुद्दावरून मोदी सरकारवर टोला लगावला. राहुल म्हणाले की, जेव्हा युपीए सरकार सत्तेत होते, तेव्हा इंटरनॅशनल बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 140 डॉलर प्रति बॅरल प्रमाणे मिळत होते. तरी देखील आम्ही पेट्रोलच्या किंमती वाढवल्या नाही. आज जगभरात भारत सर्वात जास्त पेट्रोलवर टॅक्स आकारत आहे. त्याने फक्त 4-5 उद्योजकांचे फायदे होत आहे. असे राहुल म्हणाले.