पिंपळे सौदागर मधील योगा पार्कचे काम अंतिम टप्प्यात लवकरच नागरिकांसाठी खुले होणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपळे सौदागर, (प्रबोधन न्यूज ) - रहाटणी ,पिंपळे सौदागर येथील छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन तसेच नागरिकांसाठी साकारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधा व बहुउद्देशीय योगा पार्क उद्यानाची आज मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली.
शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डनमध्ये ओपन जिमचे तसेच लहान मुलांचे खेळण्यांचे साहित्य, बसण्याचे बाक बऱ्याच दिवसापासून नादुरुस्त व तुटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना व मुलांना जिमचा व खेळण्यांचा आनंद घेता येत नाही.याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत .त्यामुळे ही सर्व व्यायामाचे साहित्य व खेळणी दुरुस्त करण्याच्या सूचना यावेळी नाना काटे यांनी केल्या असून त्यानुसार उद्यान विभागातर्फे झोके तसेच बदक खेळणी तात्काळ दुरूस्त करण्यात आले.तसेच उर्वरित साहित्य देखील लवकरात लवकर दुरूस्त करण्यात येतील असे आश्वासन संबधित उद्यान स्थापत्य व क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाना काटे यांना दिले.
त्याचबरोबर याच भागातील योगा पार्क उद्यानाच्या कामाला गती देऊन काम लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशा सूचना यावेळी नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.बहुउद्देशीय व आत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या उद्यानामध्ये लहान मुलासाठी क्लायमबिंग वॉल, स्केटिंग, योगा, प्रशस्त गार्डन, वाकिंग ट्रॅक असे वैशिष्ट्ये असलेले योगा पार्क काही दिवसात पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले करण्यात येईल असे नाना काटे यांनी सांगितले.
यापाहणीवेळी उद्यान स्थापत्य विभागाचे उपअभियंता श्री.मोरे साहेब,कनिष्ठ अभियंता वैभव विटकरे,मनपा स्थापत्य विभागाच्या सौ.प्राजक्ता गव्हाणे,क्रिडा विभागाच्या क्रिडा अधिकारी सौ.अनिता केदारी, सहाय्यक उद्यान निरीक्षक श्री.खैरे ,स्मार्ट सिटीचे अभियंता श्री.रोहित पाटील, धनराज स्वामी, प्रविण जाधव व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.