उगमस्थानापासूनच पवना, इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखा खासदार श्रीरंग बारणे यांची अधिकाऱ्यांना सूचना

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उगमस्थानापासूनच पवना, इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखा खासदार श्रीरंग बारणे यांची अधिकाऱ्यांना सूचना

 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयन्त केले जाणार आहेत. या दोन नद्यांमध्ये अनेक ठिकाणी सांड पाण्याचे नाले सोडले आहेत. यामुळे नदी दूषित होते. त्यासाठी प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडले पाहिजे. नदीच्या उगमस्थानापासून येणारे नाले आडवावेत, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका, पीएमआरडीए प्रशासनाला केल्या आहेत.

 

नदी स्वछतेसाठी काम करणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठान व सिटिझन फोरमचे डॉ. विश्वास येवले, राजीव भावसार, सूर्यकांत मुथीयान,

ओंकार गिरिधर, तुषार शिंदे, संदीप माळी, धनंजय भातकांडे, रवी उलंगवार यांच्यासह खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांच्यासोबत बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 खासदार बारणे म्हणाले, पवना, इंद्रायणीमध्ये अनेक ठिकाणी नाले थेटपणे सोडले जातात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. या पाण्यामुळे नदी दूषित होते.  नदीच्या उगमस्थानापासूनच नदीत सोडले जाणारे सांडपाणी अडविण्यात यावे. प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडले पाहिजे. त्यासाठी ज्या गावातून नदी वाहते, त्या प्रत्येक गावातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळा यांना सोबत घेऊन नदी स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.

 नदी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. महापालिका, पीएमआरडीए हद्दीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करावी. तळेगाव दाभाडे, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड ज्या क्षेत्रातील पाणी नदीपात्रात जाते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.  त्यांनाही त्यांच्या हद्दीतील पाण्यावर प्रक्रिया करण्याची सूचना करणार आहे.

 एमआयडीसीतील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यावर प्रक्रिया केली पाहिजे. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत बैठक घेणार आहे. एमआयडीसीतील पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे त्यांना सांगितले जाईल.  नदी स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. यापुढे दर महिन्याला बैठक घेऊन नदी सुधारचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्यक्ष कारवाईचा आढावा घेणार आहेत. देशाला उदाहरण ठरेल अशी पवना, इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी झोकून देवून काम करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.