भाजपलाच राहूल गांधींना हिरो बनवायचं आहे – ममता बॅनर्जी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली - “जर राहुल गांधी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कुणीच ठामपणे उभं राहू शकणार नाही”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. दुसरा कोणी विरोधी पक्षनेते होऊ नये अशी भाजपची इच्छा असल्याने ते राहुल गांधींना जाणीवपूर्णक मोठा करत आहेत असा आरोप ममता यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात मोठे टीआरपी आहेत. भाजपा संसदेचं कामकाज चालू देत नाहीये कारण त्यांना राहुल गांधी हेच विरोधी पक्षांचे नेते म्हणून हवे आहेत. भाजपाला राहुल गांधींना हिरो बनवायचं आहे”, असं त्या म्हणल्या.
गेल्या दोन आठवड्यांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. मात्र, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यावरून आणि लंडनमध्ये भारतीय लोकशाहीविषयी केलेल्या कथिच विधानावरून संसदेत सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेणं चालू ठेवलं आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस संसदेचं कामकाज होऊ शकलं नव्हतं. आत्तापर्यंत १०० तासही कामकाज होऊ शकलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.
याआधीही तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील पक्षाचे गटनेते सुदीप बंडोपाध्याय यांनी “राहुल गांधी विरोधी पक्षाचा चेहरा राहण्यात भाजपाचा फायदा आहे”, असं म्हटलं होतं.