“तासभर पथदिवे बंद करून पालिकेने ‘अर्थ अवर’ उपक्रमात सहभागी व्हावे”
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
आकुर्डीच्या डीवायपाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आवाहन
पिंपरी - तासभर पथदिवे बंद करून "अर्थ अवर" या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सहभागी व्हावे अशी मागणी आकुर्डीच्या डीवायपाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी देखील कोल्हापूरच्या धर्तीवर शहरातील पथदिवे बंद ठेवण्याची विनंती आयुक्तांना भ्रमणध्वनीद्वारे केली आहे.
विजेची बचत करण्याच्या उद्देशाने जगभरात 'अर्थ अवर डे' साजरा केला जातो. अर्थ अवर ही वर्ल्ड वाइड फंड (WWF) ची मोहीम आहे. ज्याचा उद्देश लोकांना विजेचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव करून देणे हा आहे. अर्थ अवरमध्ये जगभरातील नागरिकांना केवळ एक तास दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले जात नाही, तर सौरऊर्जेचा अवलंब करण्याचा सल्लाही दिला जातो.
अर्थ अवर डे सन 2007 साली ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून सुरू झाला आणि हळूहळू तो जगभरात लोकप्रिय झाला. 2008 मध्ये 35 देशांनी अर्थ अवर डे मध्ये भाग घेतला होता. आता 185 देश सामील झाले आहेत. अर्थ अवर दरवर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. अनेक लोक मेणबत्त्या पेटवून अर्थ अवर साजरा करतात.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये या उपक्रमाचे आयोजन डी वाय पाटील अभियांत्रिकी आकुर्डी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती देताना डी वाय पाटील अभियांत्रिकी आकुर्डी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी मालती म्हणाल्या की, विजेच्या अती वापरामुळे पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल व ग्लोबल वार्मिंग यांच्या दुष्परिणामांची जाणीव लोकांना करून देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत वीज बचतीचा संदेश देण्यासाठी सुमारे 60 मिनिटे आपल्या घरातील विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. संदीप सरनोबत यांनी संस्थेमधील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना केले आहे.
या उपक्रमाला बळ देण्यासाठी संस्थेचे चेअरमन आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे एक लाख स्ट्रीट लाईट बंद ठेवण्याची विनंती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त सिंग यांना केली आहे. असे झाल्यास संपूर्ण जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभागी होणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहरास मान मिळू शकतो. म्हणून शहरातील नागरिकांचाही सहभाग त्यामध्ये महत्त्वाचा आहे.
अर्थ अवर 2023 बद्दल अधिक माहिती देताना उपक्रमाचे आयोजन करणारे प्रा. पी.डी. चौगुले म्हणाले कि, महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे शनिवार, दि. 25 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता 60+ या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. संस्थेतील एनएसएसचे सुमारे 200 विद्यार्थी मोबाईल टॉर्चचा वापर करून हा लोगो तयार करणार आहे.
या उपक्रमाची आणखी व्याप्ती वाढवण्यासाठी सामान्य नागरिकाबरोबर शहरातील सर्व मॉल, ऍड एजन्सी, नगरसेवक यांनाही या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ट्रस्टी तेजस पाटील व कॅम्पस डायरेक्टर रियर ऍडमिरल अमित विक्रम यांचे मार्गदर्शनाखाली प्रा. महेश ताटीकोंडा, प्रा. उत्कर्षा खराडे, कु. रिया थोपटे, अभिराम कुलकर्णी विशेष परिश्रम घेतले आहे.