मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू; एकाचे शीर झाले धडावेगळे
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर एक भीषण अपघात झाला. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, कारमध्ये असलेल्या एका व्यक्तीचं शीर धडावेगळं झालं. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातामध्ये तीनजणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात महामार्गावरील उर्से गावाजवळ झाला आहे. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला आहे. कारमध्ये बसलेल्या तीनजणांचा यात मृत्यू झाला असून, अद्याप या तिघांची नावे समजू शकलेली नाहीत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक भरधाव कार कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकवर मालवाहू ट्रकवर मागून आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. हा अपघात इतका विचित्र होता की, एका प्रवाशाचं शीर धडापासून वेगळं झालं.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार (MH 04, JM 5349) वेगात होती. कारच्या समोर कोळसा घेऊन जाणारा ट्रक होता. भरधाव कार जाऊन मालवाहू ट्रकवर आदळली. अर्धी कार ट्रक मागच्या बाजूने खाली गेली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि महामार्ग पोलिसांनी लागतीच घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की कारचं बोनेट पूर्णपण ट्रक खाली गेलेलं होतं आणि चुराडा झालेला होता. चालक आणि चालका शेजारील सीटवर बसलेले दोघे पूर्णपणे अडकून पडले होते. अंगाचा थरकाप उडवणारी बाब म्हणजे चालकाशेजारच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचं शीरचं चिरडून धडावेगळं झालं होतं.
कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. चक्काचूर झालेल्या कारमध्ये मृतदेह पूर्णपणे फसलेले होते. कर्मचाऱ्यांनी हे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
तीन मृतांपैकी एकाची ओळख पटली असून, त्यांचं नाव विजय विश्वनाथ खैर आहे. ते सातारा जिल्ह्यातील असून, इतर दोघांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.