शीतल म्हात्रे प्रकरणात ऊर्फी जावेदची उडी; चित्रा वाघांवर केली टीका

माझ्या कपड्यांवरुन माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवणाऱ्या आणि मला उघड उघड धमकी देणाऱ्या चित्रा वाघ आता शीतल म्हात्रे यांना लढण्याचा सल्ला देतायंत..

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शीतल म्हात्रे प्रकरणात ऊर्फी जावेदची उडी; चित्रा वाघांवर केली टीका

मुंबई - शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना लढण्याचा सल्ला दिला आहे. चित्रा वाघ म्हणतात की, "शितल, तू लढ. आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. हा विषय फक्त शितलपुरता मर्यादीत नाहीचं, राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा."

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ्ड व्हिडीओ! या व्हिडीओवर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिलेली असताना त्यावरून उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ वादात आता उर्फी जावेद हिने उडी घेतली आहे. माझ्या कपड्यांवरुन माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवणाऱ्या आणि मला उघड उघड धमकी देणाऱ्या चित्रा वाघ आता शीतल म्हात्रे यांना लढण्याचा सल्ला देतायंत, हिपोक्रॅसीचीही काही मर्यादा असते हे या महिलेला सांगा कुणीतरी अशा शेलक्या शब्दात उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केलीय.

चित्रा वाघ यांच्या या सोशल मीडियावरील प्रतिक्रियेला उर्फी जावेद हिने रीट्वीट करत उत्तर दिलं आहे. ती म्हणते की, "ज्यावेळी माझ्या कपड्यांवरुन ही महिला माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवत होती ते विसरली. मला तुरुंगात टाका अशी मागणी करत होती. उघड उघड माझं डोकं फोडण्याची धमकी देत होती. वाह वाह वाह वाह... हिपोक्रॅसीची पण काहीतरी मर्यादा आहे हे या महिलेला कोणीतरी सांगा."

त्यामुळे आता शीतल म्हात्रे प्रकरणावरून पुन्हा एकदा या दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.