मासिक पाळीच्या रक्ताचा जादूटोण्यासाठी विक्री; महिला आयोगाने घेतली दखल
सदरचा प्रकार अतिशय घृणास्पद असून विकृत मानसिकता असणाऱ्या या आरोपींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे – बीड येथील एका कुटुंबातील सुनेवर बळजबरी करुन मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी 50 हजाराला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेचे माहेर पुण्यातील विश्रांतवाडी येथील आहे. सदरचा प्रकार अतिशय घृणास्पद असून विकृत मानसिकता असणाऱ्या या आरोपींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
चाकणकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोग या केसच्या संबंधितांना निर्देश देईलच परंतु पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रध्देला बळी पडणारी कुटुंबे आहे ही दुर्देवी बाब आहे. दोनच दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन साजरा करत आपण सर्वांनीच स्त्री शक्तीचा सन्मान केला. परंतु आज घृणास्पद घटनेत महिलेवर झालेला अत्याचार पाहून अजून किती आणि कसा लढा बाकी आहे असा प्रश्न पडतो. अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या घटना चुकीच्या आहे. अशा प्रकारच्या घटना पाहता महिलां बाबत अत्याचाराच्या घटना कितपत रुजलेल्या दिसून येते. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोग जागरुकता कार्यक्रम सातत्याने राबवत आहे.
कौटुंबिक वादातून 27 वर्षीय पत्नी सोबत अघोरी कृत्य करुन तसेच तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह सात जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीसांनी आरोपींच्या विरुध्द अनैसर्गिक कृत्य, विनयभंग व शारिरिक व मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंध अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. विवाहनंतर पिडित महिला बीड जिल्हयातील एका गावात पतीच्या घरी राहत होती. त्यावेळी मासिक पाळी दरम्यान कापसाने तिचे रक्त काढून जादुटोणा करिता त्याची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
27 वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी येथे आपल्या माहेरी आली होती. तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या आई वडिलांना सांगितला. दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि आरोपीचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पीडित महिला ही तिच्या सासरी बीड या ठिकाणी राहण्यास गेली. सासरच्या मंडळींनी मासिक पाळीच्या दरम्यान तिचे हातपाय बांधून मासिक पाळीचे रक्त काढत ते बाटलीत भरुन ५० हजार रुपयांमध्ये जादुटोण्यासाठी विकले, अशी धक्कादायक माहिती स्वत: पिडीतेने आपल्या घरच्यांना सांगितली.
महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका महिलेने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून थेट विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी पिडीत महिलेच्या सासु-सासरे,पती, मावस दीर आणि मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.