आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने महिलेची 12 लाखांची फसवणूक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने महिलेची 12 लाखांची फसवणूक

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -  आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवसायात बुकिंग, रजिस्ट्रेशन व सेल्स यासाठी पार्टटाईम काम करण्यास सांगत तसेच भरघोस परताव्याचे आमिष दाखवून महिलेकडून 11 84 हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 22 जुलै ते 30 जुलै या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  MARRIOTT BONVOY आणि त्यांचे मोबाईल क्रमांक 7701943718, 6009606484 धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना टेलिग्रामवर संपर्क करून आरोपींनी आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवसायात बुकिंग, रजिस्ट्रेशन आणि सेल्स यासाठी पार्टटाईम काम करण्यास सांगितले. तसेच यामध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. ते पैसे परत मिळविण्यासाठी फिर्यादी यांनी ऑनलाईन माध्यमातून तक्रार केली असता आरोपींनी फिर्यादीकडून पुन्हा जीएसटीच्या नावाखाली रक्कम घेतली. यामध्ये महिलेची 11 लाख 84 हजार 181 रुपयांची फसवणूक झाली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.