केंद्रीय यंत्रणाना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ उद्योग – शरद पवार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केंद्रीय यंत्रणाना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ उद्योग – शरद पवार

मुंबई, दि. 9 मार्च - देवेंद्र फडणवीस यांनी काल विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्हमध्ये जे कथित पुरावे सादर केले आहेत, तो उद्योग केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून त्यांनी केला असावा, असा दावा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी पेन ड्राईव्ह आणि त्यामधील कथित पुराव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने फडणवीस आणि भाजपाचे दावेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्हामध्ये  कथित पुरावे सादर केले होते. त्यामध्ये 125 तासांचं रेकॉर्डींग दिले आहे. या पेन ड्राईव्ह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं सविस्तर मत मांडत भाजपला आणि फडणवीस या पुराव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच आतापर्यंत ज्या पद्धतीने भाजपाने खोटारडे आरोप केले त्याचाच हा एक भाग असल्याचा संशयही निर्माण झाला आहे.

भाजपचे राज्यातून सरकार गेल्याने फडणवीस अस्वस्थ झाले आहेत. मला त्यांच्या आरोपांचा काही भाग समजला नाही. सध्या मी आरोपांच्या खोलात गेलो नाहीये. मात्र, असे प्रकरण तयार करत सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे सांगतानाच शरद पवारांनी हे सरकार 5 वर्षे टिकणार असल्याचे देखील भाष्य. केले आहे. केंद्र सरकारच्या सगळ्या एजन्सीज या फडणवीसांच्या विचारांच्या लोकांच्या हातात आहेत. त्यामुळे भाजप या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट असल्याचं यावेळी पवारांनी म्हटलंय. तसेच या 125 तासांच्या रेकॉर्डींग करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांनी फडणवीसांचं उपरोधात्मक कौतुक देखील केले आहे. प्रकरणात माझे नाव घेतले गेले आहे; मात्र या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.