पिंपळे गुरव ग्रामस्थांचा निर्धार; नाना काटेच आमचे आमदार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपळे गुरवचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ
पिंपरी, दि. 12 : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी ५ वाजता पिंपळे गुरवचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. ग्रामस्थांनी संपूर्ण ताकदिनीशी विठ्ठल उर्फ नाना काटे पाठीशी उभे राहून निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक राजू लोखंडे, माजी स्वीकृत नगरसेवक शिवाजी पाडुळे, विष्णू शेळके, पवन साळुंखे, संदीप राठोड, बाळासाहेब पिल्लेवार, नितीन सोनावणे, संदीप राठोड, राजेंद्र रणसिंग, उदय ववले, प्रभाग क्रमांक ४१ चे निरीक्षक विजू लोखंडे, प्रभाग 44 चे निरीक्षक विशाल काळभोर व सारिका पवार, प्रभाग 45 चे निरीक्षक विशाल वाकडकर, अतुल काशिद, दत्ता कदम, दीपक काशिद, किसन जगताप, आदेश जगताप, दिग्विजय जगताप, गणेश जवळकर, सतीश वाघ, निलेश चव्हाण, विजय लोखंडे, संजय ओसरमल, राहुल चोथवे, हितेश जाधव, तसेच प्रभाग क्रमांक ४१, ४४ चे सर्व पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, पिंपळे गुरव ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारात सहभागी झाले
राजेंद्र जगताप म्हणाले, की चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विठ्ठल उर्फ नाना काटे निवडणूक लढवीत आहेत. विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे चिंचवड मतदारसंघात असलेले संघटन आणि पक्षाचे प्राबल्य या जोरावर ते निवडून येतील, असा विश्वास आहे.
शामभाऊ जगताप म्हणाले, की विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आमदार करण्यासाठी संपूर्ण पिंपळे गुरव ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी एकमताने आपापसातील सर्व नाराजी विसरून एकदिलाने नाना काटे यांच्या मागे उभा राहण्याचा निर्धार केला.
तानाजी जवळकर म्हणाले, विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या रूपात आपल्या हक्काच्या माणसाला आमदार होण्याची संधी आली आहे. या निमित्ताने राज्याच्या विधिमंडळात पोहचविण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
अरुण पवार म्हणाले, की आजवर आपल्या अडीअडचणीत नि:स्वार्थ भावनेने आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नेत्यास आमदार करण्यास सर्वांनी पूर्ण ताकदीने निवडणुकीत प्रचार केला पाहिजे. या ठिकाणी मिळालेले समर्थन हे विठ्ठल उर्फ नाना काटेंना विजयाच्या नजिक घेवून जाणारे आहे.
राजू लोखंडे म्हणाले, की पिंपळे गुरवमधील आमचे समाजबांधव विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे विठ्ठल उर्फ नाना काटेच आमदार असणार आहेत.
विष्णू शेळके म्हणाले, की आदिवासी समाज हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 27 हजार लोकसंख्या आदिवासिंची आहे