पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित – मनसे नेते वसंत मोरे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित – मनसे नेते वसंत मोरे

पुणे (प्रबोधन न्यूज) - कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथील दिवंगत आमदारांच्या निधनानंतर शिंदे फडणवीस सरकारने त्याठिकाणी लगेच पोटनिवडणूक जाहीर केली. त्यावरून मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. तुमची मते कमी होतील, म्हणून लगेच त्याठिकाणी निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत तुमचा पराभव निश्चित समजा, असे ते म्हणाले. सोशल मीडियावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मागील एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत, असे सांगत वसंत मोरे यांनी महापालिका निवडणुका कधी घेणार? अशी विचारणा केली आहे. त्यासंदर्भातील समाजमाध्यमातूनच त्यांनी पोस्ट करत सरकारची पोटनिवडणुकीवरून कानउघडणी केली आहे.

माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या दोन आमदारांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सरणाची राख अजून निवली सुद्धा नाही, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या-त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना चेहरा दाखवावा वाटत नाही. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो, जर कोणत्या पक्षाला सहनुभूती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण, जो मनातून हरतो तो रणात काय जिंकणार, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.