पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा निश्चित, कार्यक्रमात शरद पवारही मंचावर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे , (प्रबोधन न्यूज ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीला हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुण्यात येतील. पुरस्कार सोहळ्याशिवाय ते मेट्रोच्या विस्तारीत मार्गाला हिरवा झेंडाही दाखवणार आहेत. पुरस्कार सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ८ वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहेत.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित टिळक यांनी पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचं म्हटलंय. शनिवारी याबाबतची माहिती त्यांनी दिली. हा पुरस्कार सोहळा हा राजकीय नसून अशा कार्यक्रमात नेत्यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेऊ नये असं मतही रोहित टिळक यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षांकडून शरद पवार यांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान मोदी एक ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात येतील. त्यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची पूजा करण्यात येईल. दर्शन घेतल्यानतंर पंतप्रधान मोदी 11.45 वाजता लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहतील. त्यानतंर पंतप्रधान मोदी 12.45 वाजता मेट्रो ट्रेनच्या विस्तारित मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती समजते. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवडमधील १२८० घरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तर पुणे महापालिकेच्या २६८० घरांचे लोकार्पण होणार आहे.