खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पात सुरुंगाचा स्फोट, एका मजुराचा मृत्यू, एक जखमी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पात सुरुंगाचा स्फोट, एका मजुराचा मृत्यू, एक जखमी

पुणे (प्रबोधन न्यूज) – पुण्यातील खराडी भागात सुरुंगाचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात एक बांधकाम मजूर जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. बांधकाम प्रकल्पातील खडक फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला होता. त्यामुळे सुरुंगाचा स्फोट होऊन एका मजुराला दगडाचा मार लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. कादीर रेमन शेख (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. तर स्फोटात उडालेला दगड लागल्यामुळे नरेश मनुचौधरी या मजुराचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

खराडी भागात प्लॅनेज कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीकडून बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. खोदलेल्या खड्ड्यात सुरुंग लावल्यामुळे खड्ड्यातील दगड उडाला. तो दगड शेख या मजुराच्या डोक्याला लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

निष्काळजीपणे स्फोटके उडविल्याप्रकरणी सचिन दिलीप आटपाडकर (वय ३८), गौतम मंडल (वय ३६), दीप मार्सकोले (वय २३, तिघे रा. घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.