मुंबई महनगरपालिकेचा 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुंबई महनगरपालिकेचा 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई (प्रबोधन न्यूज) - महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 2023 आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडला. यंदा मुंबई महापालिकेने विक्रमी ५२ हजार कोटीचं बजेट सादर केलं. मुंबई मनपाच्या बजेटने पहिल्यांदाच ५० हजार कोटींचा आकडा पार केला. महत्त्वाचं म्हणजे, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.

प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी तब्बल १५०० कोटी रूपयांची तरतूद

मुंबईमध्ये सध्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पात तब्बल १५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अशी तरतूद इतिहासात प्रथमच करण्यात आलेली आहे. शहरातील वायु प्रदुषण कमी करण्यासाठी वायु प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी विविध योजना, प्रकल्प, सेवासुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची भरीव तरतूद असलेला सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षासाठीचा ५२,६१९.०७ कोटींचा व ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा आणि कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेला अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांनी शनिवारी मुंबईकरांसाठी सादर केला. तत्पूर्वी, मुंबई महापालिकेचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी तर यंदाचा संपूर्ण अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी प्रशासक व पालिका आयुक्त इकबाल चहल यांना सादर केला.

गतवर्षी आयुक्तांनी, ४५,९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदा ५२,६१९.०७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल ६,६६९.८६ कोटीने (१४.५२ टक्के) वाढ करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न ३३,२९०.०३ कोटी रुपये, तर खर्च २५,३०५.९४ कोटी रुपये दाखविण्यात आला आहे. तर, भांडवली उत्पन्न ५८२.९५ कोटी रुपये आणि भांडवली खर्च १९,८४७.८० रुपये दाखविण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भांडवली खर्च हा महसुली खर्चापेक्षाही जास्त आहे, असा दावा पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केला आहे.

सन २०२१ – २२ या वर्षीचा अर्थसंकल्प ३९,०३८.८३ कोटींचा व ११.५१ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प होता. तर सन २०२२ – २३ चा अर्थसंकल्प ४५,९४९.२१ कोटींचा व ८.४३ कोटी शिलकीचा होता. यंदाचा अर्थसंकल्प हा ५२,६१९.०७ कोटींचा व ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा सादर करण्यात आला आहे.

पालिकेने हाती घेतलेल्या जुन्या योजना, प्रकल्प, विकासकामे यांना आवश्यक निधीची पूर्तता करून त्यांना चालना देण्यात येणार आहे. विशेषतः मुंबईच्या सुशोभिकरणावर अधिक जोर देण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून आयुक्त यांनी, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता ठेवण्याचा, भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचा व मुंबईकरांना अधिकाधिक चांगल्या व आधुनिक सेवासुविधा देण्याचा संकल्प सोडल्याचे दिसते. तसेच, तूर्तास जरी करवाढ व दरवाढ होणार नसली तरी भविष्यात उत्पन्न वाढीसाठी छुप्या पद्धतीने करवाढ किंवा दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.