श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा आयोजित

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा आयोजित

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन सोहळा पार पडणार आहे. सदर कार्यक्रम ४ फेब्रुवारीला असणार आहे. हा सोहळा जय गणेश लॉन्स, भारत माता चौक, न्यू आळंदी देहू रोड, पुणे-नाशिक हायवे, मोशी याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्रातून तसेच विविध ठिकाणांवरून भाविक भक्तांची गर्दी होणार आहे. शनिवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता जगद्गुरु श्रींचे संतपीठावर आगमन झाल्यानंतर स्वागत समारंभ होईल आणि लगेचच मार्गदर्शनाला सुरुवात होईल. सकाळी ११ नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन सायंकाळ पर्यंत असणार आहे. दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३, रविवार रोजी ९ ते ११ मार्गदर्शन व ११ नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. दोन्ही दिवसाचा जगद्गुरुश्रींचा कार्यक्रम संपन्न होत असताना दोन्हीही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी जगद्गुरुश्रींच्या अमृतवाणीचा, दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यावा असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान उपपीठ पश्चिम महाराष्ट्र पिठाचे व्यवस्थापक मा. श्री. सुधांशू दीपक जाधव यांनी केले आहे.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान लोकोपयोगी उपक्रम खालीलप्रमाणे -

शैक्षणिक उपक्रम :- गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य.

२. वैद्यकिय उपक्रम संस्थानाच्या वतीने ३७ अॅम्ब्युलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीजधाम येथे २४ तास मोफत हॉस्पिटल सेवा सुरू आहे.

३. कृषी विषयक उपक्रम:- गोरगरीब शेतकऱ्यांना मोफत शेती बी बियाणे खते, औषधे, शेती अवजारे वाटप केले जाते.

४. आपत्कालीन मदत उपक्रम:- दुष्काळ पडल्यास संस्थानाच्या वतीने जनावरांना मोफत शेकडो टन चारा पुरविला जातो, अन्नधान्य वाटप केले जाते.

५. अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम :- अंगारे, दोरे, चुपारे गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म, विज्ञान, व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जाते.

६. दुर्बल घटक मदत उपक्रम:- निराधार महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, शेळ्या, मेंढया, दुभत्या गाई, म्हशींचे वाटप केले जाते.

अशा प्रकारे अनेक विविध उपक्रम राबविले जातात.