लाभार्थ्यांनी घेतला जबरदस्तीने सदनिकांचा ताबा; लिंकरोड वरील घटना
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प इमारतीतील सदनिकेचे वाटप होण्यापूर्वीच काही नागरिकांनी सदनिका ताब्यात घेत घुसखोरी केली. महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात तातडीने कारवाईत करीत घुसलेल्यांना बाहेर काढले. सुरक्षेसाठी त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
महापालिकेने लिंक रस्त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात इमारती उभारल्या आहेत. एका इमारतीमध्ये ११२ सदनिका असून, दोन इमारतीतील २२४ सदनिकांचे वितरण होणे बाकी आहे. पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून स्वहिस्सा रक्कम जमा करून घेतली जात आहे, अशा लाभार्थ्यांना सदनिकेचा ताबा दिला जाणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे सोडतीचा कार्यक्रम स्थगित झाला. त्यावरून काही संघटनांच्या वतीने चिंचवडच्या झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रकल्पाच्या इमारतीच्या ठिकाणी बुधवारी (दि. १३) नागरिकांसह लाभार्थ्यांनी भरपावसात गर्दी केली. यादीनुसार एका ठिकाणीच सर्वांना सदनिका द्या, अशी त्यांनी आग्रही मागणी करीत घोषणाबाजी केली.
प्रवेशद्वाराचे टाळे तोडून इमारतीमध्ये प्रवेश केला. सदनिकेचे कुलूप तोडून तेथे घुसखोरी केली. काहींनी स्वत:चे कुलूप लावून हक्क सांगितला. घुसखोरीचा हा प्रकार समजताच पालिका प्रशासन सतर्क झाले. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व अधिका-यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांना समजून सांगितले. कागदपत्रांची पूर्तता करा. स्वहिस्सा भरा. त्यांना सदनिका वितरीत केल्या जातील, अशी ग्वाही दिली. पोलिस बंदोबस्त मागवून घेऊन नागरिकांनी लावलेले टाळे काढून घेतले. सर्व परिसर रिकामा करून घेऊन तेथे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.