पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या घर चलो अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद ; शंकर जगताप यांनी घेतल्या घरोघरी नागरिकांच्या भेटी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, ( प्रबोधन न्यूज ) - पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी ४ फेब्रुवारीपासून शहरात “घर चलो अभियान” राबविण्यात येत असून, या अभियानाला पिंपरी चिंचवड शहरवासियांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. या अभियानांतर्गत भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांच्याकडील सोपविलेले बूथ क्रमांक १०९, ११० आणि १११ वरील नागरिकांशी संवाद साधला. दोन सत्रांमध्ये बिजलीनगर, शिवनगरी, गिरिराज या भागातील ७० घरांमध्ये जावून मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. सकाळी ९ वाजता बूथ प्रमुख- विवेक चिटणीस यांच्या घरी चहा - नाष्टा करून अभियानाला सूरूवात झाली. पहिल्या सत्रात या भागातील ७० घरांमध्ये जावून नागरिकांसोबत संवाद साधून मोदी सरकारचा दहा वर्षातील विकास, विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देवून २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारत आणि महासत्ता करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान बनविण्याच्या दृष्टीने आवाहन करण्यात आले.
तसेच, सामाजिक कार्यकर्ते संभाजी (नाना) मरळ यांच्या घरी भोजन करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी, भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेविका मोनाताई कुलकर्णी, माजी सत्तारुढ पक्षनेते शामराव वाल्हेकर, बाजीराव चिंचवडे, सुपर वॉरिअर सचिन गोसावी, अनिकेत दळवी, महेश घुले, महेश कलाल, मुरलीधर चोपडे, जयवंत भोसले आदी उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले की, देशात सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात देशाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला आहे. गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशांतर्गत व बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करून आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. त्याचप्रमाणे देशातील भाजपशासित राज्यांनीही मोठा विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्र व राज्य सरकारांची हीच विकासाची गाथा तळागाळापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी दि. ४ ते ११ फेब्रुवारी या काळात घर चलो अभियान राबविण्यात येत आहे.
घर चलो अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी दोन सत्रात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बुथ कार्यकर्त्याकडून हे अभियान राबविले जात आहे. त्याला पिंपरी चिंचवडकरांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, असे शंकर जगताप यांनी सांगितले.