पुण्यात डॉक्टरने रुग्ण तरुणीवर बलात्कार करून विवस्त्रावस्थेत काढले फोटो

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात डॉक्टरने रुग्ण तरुणीवर बलात्कार करून विवस्त्रावस्थेत काढले फोटो

पुणे, (प्रबोधन न्यूज) - पुणे शहरात एका डॉक्टरने दानवासारखं कृत्य केलं आहे. रुग्ण तरुणीवर नराधम डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार करून नराधम डॉक्टर थांबला नाही, तर त्याने पीडितेचे विवस्त्रावस्थेत फोटो काढले. कोथरुड परिसरात घडलेल्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. नराधम डॉक्टरविरुद्ध कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. डॉ. योगेश वाल्हे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला पाठीच्या मणक्यांचा आजार आहे. त्यामुळे ती कोथरुड परिसरातील पौड रस्त्यावर डॉ.योगेश वाल्हे यांच्या क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी गेली होती. उपचाराच्या नावाखाली नराधम डॉक्टरने पीडितेचे विवस्त्रावस्थेत मोबाईलमध्ये फोटो घेतले. याबाबत कुठे वाच्यता करशील तर सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी पीडितेला त्याने धमकी देखील दिली.

इतकंच नाही तर पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत अनेकदा बलात्कार केला. नराधम तिला कायम धमकावत राहिला. मात्र, या प्रकाराला त्रासून अखेर पीडितेने पोलिस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टरविरुद्ध कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.