कैप्टन अमरिंदर होणार उपराष्ट्रपती ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कैप्टन अमरिंदर होणार उपराष्ट्रपती ?

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - पंजाबमधून आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार असू शकतात. खरंतर कॅप्टन आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कॅप्टनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. पक्षाच्या विलीनीकरणासोबतच त्यांची उमेदवारीही जाहीर होणार असल्याचे वृत्त आहे.

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग लंडनहून परतल्यानंतर त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस (PLC) भाजपमध्ये विलीन करू शकतात, अशीही बातमी आहे. यासंदर्भात भाजप नेते हरजित सिंग ग्रेवाल यांनी आज हा दावा केला आहे. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर अमरिंदर सध्या लंडनमध्ये बरे होत आहेत. भाजपने त्यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी पक्षाच्या पंजाब युनिटचे ज्येष्ठ नेते ग्रेवाल यांनी शनिवारी यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याचा मोठा दावा केला आहे.

खरे तर, ग्रेवाल यांनी स्वतःच सांगितले होते की, लंडनला जाण्यापूर्वी अमरिंदर यांनी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा मानस व्यक्त केला होता. ते म्हणाले की, अमरिंदर लंडनहून परतल्यानंतर भाजप आणि पीएलसीच्या विलीनीकरणाची घोषणा करतील. पंजाबचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अमरिंदर यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर काँग्रेस सोडली आणि पीएलसीची स्थापना केली. पीएलसीने 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक भाजप आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दल (युनायटेड) यांच्यासोबत युती करून लढवली होती. त्याच वेळी माजी मुख्यमंत्री अमरिंदर स्वतः पतियाळा अर्बन मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत.