वडगाव-मावळमधील सागर इंद्रा टोळीतील सदस्याच्या खुनाचे गूढ उलगडले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वडगाव-मावळमधील सागर इंद्रा टोळीतील सदस्याच्या खुनाचे गूढ उलगडले

पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ ने आरोपींना ठोकल्या बेडया

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – वडगाव मावळ येथील मातोश्री हॉस्पीटल जवळ, रोडचे कडेला असणाऱ्या  पानाच्या टपरीजवळ विश्वजीत देशमुख (वय २२ वर्षे) याच्यावर अज्ञात तरुणांनी तलवारीने वार करून त्याचा खून केला होता. ही घटना १३ जून रोजी घडली होती. त्याच्या खुनाचे गूढ आता उलगडले असून, आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पिंपरी-चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ ने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाली की, काळेवाडी परीसरात राहणारे आदित्य ऊर्फ़ सोन्या चौहान व राम विजय जाधव हे काळेवाडी चौकात असताना त्यांनी तळेगाव किंवा वडगाव मावळ परीसरात कोठेतरी कोणाचा तरी गेम केला असल्याबाबत चर्चा करत होते. अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी युनिट १ कडील स्टाफची दोन पथके तयार करुन त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून पथकासह स्वत: काळेवाडी, रहाटणी, आकुर्डी या परिसरात जाऊन त्या दोघांचा शोध घेत असताना आकुर्डी येथील जयगणेश व्हीजन, आयनॉक्स थिअटरचे पार्किंगमध्ये राम जाधव व अदित्य उर्फ सोन्या चव्हाण हे दोघे त्याच्या मित्रासोबत दिसले. त्यावेळी त्यांना पडण्यासाठी पोलीस पथक त्यांच्याकडे जात असताना ते पळुन जाऊ लागले तेव्हा त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना पकडण्यात यश मिळाले.

ताब्यात घेतलेले राम विजय जाधव, (वय २२ वर्षे, रा. पंचतारा नगर, आकुर्डी, पुणे २.) व आदित्य ऊर्फ सोन्या सुरेंद्र चौहान, (वय २२ वर्षे, रा. श्री बालाजी गल्ली नं.२, धनगर बाबा मंदिरामागे, काळेवाडी, पुणे) यांच्याकडे सखोल चौकशी करता दिनांक ०७/०६/२०२२ रोजी आरोपी व त्याचे इतर ६ मित्र असे वडगाव मावळ येथे वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात असताना मातोश्री हॉस्पीटल जवळ, रोडच्या कडेला असणाऱ्या पानाच्या टपरीवर थांबलेल्या इसमांशी किरकोळ कारणावरुन त्यांची भांडणे झालेली होती व टपरी चालक व त्याच्या मित्रांनी त्यांना मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी व त्याचे सहा साथीदार यांनी दि.१३/०६/२०२२ रोजी पुन्हा पानाच्या दुकानाजवळ जाऊन त्यांना मारहाण करणाऱ्या माणसावर त्यांनी तलवार व कोयत्याने वार केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या घटनेची वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडे खातरजमा करता त्याच्याकडे सदर गुन्हा दाखल असून सदरच्या मारहाणीत विश्वजीत देशमुख, (वय २२ वर्षे) हा मयत झाल्याचे व भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मयताचा मित्र सागर इंद्रा यास गंभीर जखमी करुन आरोपी पसार झाल्याची माहिती त्यांनी दिली. अशा प्रकाराने अज्ञात आरोपींविरुद्ध दाखल झालेला खुनाचा गुन्हा केवळ ऐकीव माहिती गाभिर्याने घेऊन त्याची खातरजमा करुन गुन्हा उघड करण्यात गुन्हे शाखा, युनिट -१ यांना यश मिळालेले आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर तसेच पोलीस अंमलदार महादेव जावळे, बाळू कोकाटे, सोमनाथ बोहाडे, अमित खानविलकर, मनोजकुमार कमले, गणेश महाडीक, उमाकांत सरवदे, सचिन मोरे, प्रमोद हिरळकार, विशाल भोईर, मारुती जायभाय, प्रमोद गर्जे, स्वप्निल महाले यांच्या पथकाने केली आहे. अशी माहिती पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी दिली आहे.