पेट्रोल पंपावर दरोडयाच्या तयारीत असलेल्या टोळीस धारदार शस्त्रांसह अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पेट्रोल पंपावर दरोडयाच्या तयारीत असलेल्या टोळीस धारदार शस्त्रांसह अटक

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – निगडी भागात ट्रान्सपोर्टनगर परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट दोनने आवळल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १६ ला तडीपार गुन्हेगार चेकींगसाठी पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हे शाखा युनिट २ चे नामदेव कापसे व अजित सानप यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, दादया गवळी टोळीचा म्होरक्या व रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार नामे आनंद उर्फ दादया राजू गवळी, तडीपार गुन्हेगार जाकीर ऊर्फ डॅनी कय्युम पठाण व तडीपार गुन्हेगार सागर रामदास जाधव (रा. राहूलनगर ओटास्किम निगडी) हे त्यांचे इतर सराईत साथीदारांसह रात्री निगडी भागात ट्रान्सपोर्टनगर परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार आहेत. सध्या ते सर्वजण भिमाईनगर ओटास्किम निगडी येथे एकत्रात जमून दरोडयाच्या धारदार शस्त्रांची व साहित्याची जुळवा जुळव करुन दरोडा टाकण्याची तयारी करीत आहेत अशी बातमी मिळाली.

पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलीस फौजदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, पोलीस नाईक नामदेव कापसे, आतिष कुडके, पोलीस कॉन्स्टेबल अजित सानप, शिवाजी मुंढे अशांनी बातमीच्या ठिकाणी सापळा लावून आरोपी १) आनंद उर्फ दादया राजू गवळी (वय २० वर्षे, धंदा- मजुरी, रा. जिवलग हौसिंग सोसायटी बिल्डींग नंबर ७ रुम नंबर ३०३, आझाद चौक निगडी) २) दीपक अरुण चांदणे (वय २२ वर्षे, धंदा - ड्रायव्हर रा. आर १ बिल्डींग रुम नंबर ४ ओटास्किम निगडी), ३) सागर रामदास जाधव (वय २१ वर्षे, धंदा - काही नाही, रा. राहुलनगर पवळे शाळेजवळ बिल्डींग नंबर १२ रुम नंबर ६ ओटास्किम निगडी) व त्यांचे २ रेकॉर्डवरील अल्पवयीन साथीदार यांना शिताफीने पकडले.

सदर आरोपी यांच्याकडे १ धारदार लोखंडी तलवार, २ धारदार लोखंडी कोयते, १ लोखंडी रॉड, २ मिरची पावडर पुड, दोर, मोबाईल, रक्कम असे साहित्य सापडले. आरोपींनाना गुन्हे शाखा युनिट २ च्या कार्यालयात आणून सखोल तपास केला असता, सदर आरोपी हे ट्रान्सपोर्टनगर निगडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी हे गुन्हेगारी टोळीतील सराईत व तडीपार गुन्हेगार आहेत. आरोपींविरुध्द पोलीस हवालदार जयवंत राऊत यांच्या  फिर्यादीवरुन निगडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहीता कलम ३९९, ४०२ व भारतीय शस्त्र कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५, १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गिरीगोसावी हे करीत आहेत.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट २ चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार केराप्पा माने, विपुल जाधव,  दीपक खरात, शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, प्रमोद वेताळ, उषा दळे, जयवंत राऊत, देवा राऊत, नामदेव कापसे, आतिष कुडके, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर, संदेश देशमुख यांच्या पथकाने केली आहे.