लैंगिक अत्याचार अन् अश्लील व्हिडीओ; कल्याणमध्ये तरूणीची आत्महत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लैंगिक अत्याचार अन् अश्लील व्हिडीओ; कल्याणमध्ये तरूणीची आत्महत्या

कल्याण, (प्रबोधन न्यूज) - कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका तरूणीने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणात पोलिसांनी सात महाविद्यालयीन तरूण, एक तरूणी अशा आठ जणांविरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तरूणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

तरुणीने गच्चीवरून खाली उडी मारून आयुष्य संपवलं. तरुणीच्या मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला. कारण होत मागील दीड वर्षांपासून सात तरुणांकडून केला जात असलेला अत्याचार. हे तरुण पीडित तरुणीला व्हिडीओला व्हायरल करण्याची धमकी देत होते. यात एक तरुणी ७ तरुणांना मदत करत होती.

दीड वर्षांपासून होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून तरुणीनं राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांना आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट मिळाली असून, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

अश्लील चित्रफिती समाज माध्यमात प्रसारीत झाल्या तर आपली, कुटुंबाची बदनामी होईल. घरात हा प्रकार समजला तर आपणास कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती या तरूणीला होती. त्यामुळे नैराश्य आलेल्या या तरूणीने काटेमानिवली येथील राहत्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. सोसायटीच्या आवारात मोठ्याने आवाज झाल्याने रहिवासी बाहेर आले. त्यावेळी त्यांना तरूणीने आत्महत्या केल्याचे समजले.

पीडितेनं बारावीची परीक्षा दिली होती आणि नुकताच तिचा निकालही आला होता. बारावीच्या परीक्षेत तिला ७१ टक्के पडले होते. तिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मयत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली.

या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सुसाईड नोटमधील मजकुरामुळे पोलीसही थक्क झालं. सदर मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते.

धक्कादायक बाब म्हणजे या सात विकृत नराधमांना एक तरुणी हे कृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी पीडित तरुणीची मैत्रीण आहे. पोलिसांनी या प्रकणात आठ जणांना अटक केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

सनी पांडे, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यामधील कृष्णा जयस्वाल व काजल जयस्वाल हे भाऊ बहिण आहेत. दरम्यान अटक आरोपीमधील काही कल्याणमधील बिल्डरची मुलं असल्याची माहिती समोर आली आहे.

"माझ्या भाचीवर बलात्कार झाला आहे. दीड दोन वर्षांपासून तिला त्रास दिला जात होता. पोलिसांनी न्याय द्यावा. हे त्याच्या बिल्डिंगचे लोक आहेत. बाजूचे काही पैसेवाले लोक आहेत. मोठंमोठे लोक आहेत. यामध्ये सात ते आठ जण असून, पोलिसांनी रिमांड घेतल्यास आणखी लोक बाहेर येतील. मुलीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट आहे. मोबाईल पोलीस ठाण्यात जमा आहे. हे लोक माझ्यावर अत्याचार करायचे, माझे व्हिडीओ बनवून मला धंद्यावर बसवायचे, असं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे," आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मामाने म्हटलं आहे.