व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

       पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    महिला काम करत असलेल्या कंपनीच्या शौचालयातील महिलेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे शरीर सुखाची तसेच पैशाची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. ही घटना शुक्रवार (दि. 14) सकाळी आठ ते शनिवारी (दि. 15) सायंकाळी साडेचार वाजताच्या कालावधीत एमआयडीसी भोसरी आणि आदर्शनगर भोसरी येथे घडली.

सुनील हरिबा कांबळे (वय 36, रा. चिखली. मूळ रा. धाराशिव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीच्या शौचालयात फिर्यादीचा व्हिडीओ काढून तो आरोपीने फिर्यादी यांच्या व्हाटसअपवर पाठवला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडे शरीर सुखाची तसेच तीन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.