पुलावरून कार पडून वैद्यकीय सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, आमदारांच्या मुलाचाही समावेश

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुलावरून कार पडून वैद्यकीय सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, आमदारांच्या मुलाचाही समावेश
वर्धा - 

तिरोरा येथील भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले यांच्यासह सात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा काल रात्री 11.30 वाजता सेलसुराजवळील पुलावरून कार कोसळून मृत्यू झाला. हे सर्वजण देवळीहून वर्धा सावंगी मेडिकल कॉलेजकडे जात होते. सेलसुरा शिवारातून जात असताना अचानक एक जंगली प्राणी पुलाजवळ आला, त्याला वाचवण्यासाठी गाडी अनियंत्रितपणे खड्ड्यात पडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अविष्कार रहांगडाले (भाजप आमदाराचा मुलगा), नीरज चौहान, नितीश सिंग, विवेक नंदन, प्रत्युष सिंग, शुभम जय आणि पवन शक्ती यांचा समावेश आहे.

प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये
पीएम मोदी यांनी महाराष्ट्रातील सेलसुराजवळ झालेल्या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.