नवरा आणि त्याच्या मैत्रिणीला विवस्त्र करून गावात फिरवले; व्हिडिओ व्हायरल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नवरा आणि त्याच्या मैत्रिणीला विवस्त्र करून गावात फिरवले; व्हिडिओ व्हायरल

छत्तीसगड, (प्रबोधन न्यूज) - छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाला आणि त्याच्या मैत्रिणीला नग्न करून संपूर्ण गावात फिरवण्यात आले आहे. ही अत्यंत संवेदनशील बाब समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या भीषण कृत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.

ही घटना कोंडागाव जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या पत्नीने तिच्या मैत्रिणीसोबत एका खोलीत पकडले. यानंतर महिलेने आरडाओरडा करून ग्रामस्थांना तेथे बोलावले. यानंतर गावकऱ्यांनीच तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला.

या शिक्षेअंतर्गत प्रथम विवाहित तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना विवस्त्र करून गावात फिरवले. ही घटना शनिवारी घडली  असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्याचा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.