पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनारुग्णांची वाढ ; आठवडय़ात २३ हजार नवे रुग्ण
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे -
शहरासह जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मागील आठवडाभरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. पुणे शहरात तब्बल २३,४५४ रुग्णांची वाढ झाली आहे. संसर्गाचा दरही १५.२४ टक्क्यांवरून तब्बल २८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रुग्णवाढीचा हा वेग प्रचंड असला, तरी रुग्णालयांत दाखल होणारे किंवा कृत्रिम प्राणवायूची गरज भासणारे रुग्ण अत्यल्प आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन गांभीर्याने करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून पुणे शहरातील रुग्णसंख्येत टप्प्याटप्प्याने वाढ दिसण्यास सुरुवात झाली. करोनाबाधित रुग्णांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांमधून पुणे शहर आणि जिल्ह्यातील मोठय़ा प्रमाणात रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरात दिसणारी ही वाढही प्रामुख्यने ओमायक्रॉन रुग्णांचीच असल्याचे दिसून येत आहे. ७ जानेवारी ते १३ जानेवारी या एका आठवडय़ात शहरात तब्बल २३,४५४ नवीन रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
शहरातील करोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. आठवडाभरात रुग्णांच्या संख्येत २३ हजारांची वाढ झाली असली, तरी त्यांपैकी केवळ साडेचार ते पाच टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, श्वसनरोग अशा सहव्याधी असलेले आहेत. मात्र, त्या व्यतिरिक्त इतर रुग्णांना असलेली लक्षणे अत्यंत सौम्य असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात आठवडाभरात एक लाख सात हजार ९८९ करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यांपैकी २३,४५४ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यामुळे शहराचा आठवडय़ाचा संसर्गाचा दर २१.७१ टक्के एवढा नोंदवण्यात आला.