उद्या (बुधवार) बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उद्या (बुधवार) बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - यंदा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. उद्या 12 वीचा निकाल लागणार आहे. उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल.

निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

बारावीचा निकाल कसा तपासायचा? (HSC Result 2022)

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा – mahresult.nic.in.
  2. मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.
  3. HSC निकाल 2022 (कला, विज्ञान किंवा वाणिज्य) साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.
  4. लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
  5. तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  6. तसेच, भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 12वी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि घ्या.