आपला पाल्य ‘या’ 8 अनधिकृत शाळेत शिकत नाही ना ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आपला पाल्य ‘या’ 8 अनधिकृत शाळेत शिकत नाही ना ?

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - पिंपरी–चिंचवड महापालिका क्षेत्रात शासनाची कोणतीही परवानगी न घेता 8 शाळा अनधिकृतरित्या चालविण्यात येत आहेत. या शाळांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

शासनाच्या मान्यतेने खासगी अनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थ सहाय्यित सर्व माध्यमाच्या शाळा चालविल्या जातात. परंतु, काही शाळा या शासनाची मान्यता न घेता अनाधिकृतरित्या चालविल्या जातात. सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात महापालिका कार्यक्षेत्रातील विभागीय पर्यवेक्षकांमार्फत शाळांची तपासणी केली. त्यात 8 खासगी प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

या आहेत अनधिकृत शाळा

कासारवाडीतील मराठी माध्यमाची ज्ञानराज प्राथमिक शाळा, रहाटणीतील इंग्रजी माध्यमाचे मॉर्डन पल्बिक स्कूल, भोसरीतील मास्टर केअर इंग्लिश स्कूल, चिखलीतील ग्रँट मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, सांगवीतील एम.एस. स्कूल फॉर किड्स, पिंपळेसौदागर येथील साई स्कूल ऑफ एक्सलेन्स, चिखलीतील सेंट रोझरी इंग्लिशम मिडीयम स्कूल आणि रहाटणी, काळेवाडातील माने इंग्लिश स्कूल या 8  शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत. या शाळांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील संबंधित पालकांनी आपल्या पाल्यास या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेवू नये, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.