महाविकास आघाडीत बिघाडी? पुढील निवडणुकीत तुमचे तुम्ही, आमचे आम्ही बघतो

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महाविकास आघाडीत बिघाडी? पुढील निवडणुकीत तुमचे तुम्ही, आमचे आम्ही बघतो

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेत आपापलं बघा, निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा सहावा उमेदवार पराभूत झाल्याने हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला हवी तशी मदत केली नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला एकोप्याची भूमिका दाखवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करुन शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीवर विश्वास ठेवायला तयार नाही. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे.

तर दुसरीकडे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे अपक्ष आमदार नाराज झाले आहेत. देवेंद्र भुयार यांनी म्हटलं, शिवसेनेचं नियोजन चुकलेलं आहे. मला एक सुद्धा फोन शिवसेनेकडून आला नाही तरी मी त्यांना मतदान केलं आहे. आम्ही शरद पवारांची भेट घेणार आहोत. प्रामाणिकपणे मतदान करुन सुद्धा अशा प्रकारे आमच्याबाबत विधान केले जात असतील तर हे चुकीचं आहे. आम्हालाही लोकांनी निवडून दिलं आहे आणि अशावेळी आमच्याविषयी गैरसमज करणं चुकीचं आहे.

आता आम्हाला सर्व अपक्ष आमदारांना एकत्र येऊन विचार करावा लागेल. हा केवळ माझ्या एकट्यावर नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे असंही आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.