डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठमध्ये शुक्रवारी राजनाथ सिंह येणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठमध्ये शुक्रवारी राजनाथ सिंह येणार

पिंपरी-चिंचवड, दि. 19 मे – डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाचा 13 वा पदवीप्रदान समारंभ पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रसिद्ध उद्योजक व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांना मानद पदवी डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (अभिमत विद्यापीठ, नागपूर) प्र-कुलपती व प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एससी) ही मानद पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे. या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या 26 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 2191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येत आहे. त्यामध्ये 12 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 1416 पदव्युत्तर पदवी, 754 पदवी आणि 9 पदविका या अशा एकूण 10 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील उपस्थित राहणार आहेत.