खराळवाडी भागातील नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हैराण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खराळवाडी भागातील नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हैराण

पिंपरी-चिंचवड, दि. 18 मे – खराळवाडी, नेहरूनगर येथे महानगरपालिकेतर्फे एक दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येते. परंतु ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशीही पुरेसे पाणी नागरिकांना मिळत नाही. पुरेशा दाबाअभावी व अपुरा पाणीपुरवठा या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रभागातील नगरसेवकांचेही नागरिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. या भागातील सोसायट्यांना दर चार दिवसांनी पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे सोसायट्यांचे आर्थिक बजट कोलमडले आहे.

या उलट अजमेरा, मासुळकर कॉलनी येथे दररोज पाणी पुरवठा केला जातो. हा भेदभाव का असा प्रश्न नागरिक विचारत आहे. तेथील नगरसेवक कार्यक्षम आहेत असे मानायचे का ? खराळवाडी, नेहरूनगर या भागातील पाणी समस्या पूर्वीपासूनच आहे. त्यासाठी नवीन टाकी बांधण्यात येणार आहे जरा कळ काढा असे उत्तर यापूर्वी मिळायचे. पाच वर्षे यातच गेली. नवीन टाकी बांधूनही झाली. पण या नवीन टाकीतून खराळवाडीला पाणीपुरवठा होतो का याचे उत्तर उलट सुलट मिळत आहे. जर नवीन टाकीतून पाणीपुरवठा होत असेल तर पाण्याची समस्या अजूनही का भेडसावत आहे, आणि जर नवीन टाकीतून पाणी पुरवठा होत नसेल तर का होत नाही याचेही उत्तर मिळत नाही.

महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आयुक्त राजेश पाटील, माजी नगरसेवक, भावी नगरसेवक यांनी खराळवाडी, नेहरूनगर भागात होणारा अपुरा पाणीपुरवठा याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. प्रत्येक वेळी मोर्चा काढणे हा त्यावर उपाय असू शकत नाही.