जात संपविण्यासाठी ब्राह्मणांचीच पुढाकार घ्यावा – शरद पोंक्षे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जात संपविण्यासाठी ब्राह्मणांचीच पुढाकार घ्यावा – शरद पोंक्षे

पुणे, दि. 10 मे - अनेक जातीयवाद्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केले आहे. ते स्वच्छ करण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांनीही समाजसुधारणा केली आहे. त्यात ब्राह्मणांचाही वाटा मोठा होता. मात्र, जात संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. आम्ही सारे ब्राह्मण या पाक्षिकाच्या वर्धापनदिनी शरद पोंक्षे यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला. या वेळी सुधीर गाडगीळ यांनी शरद पोंक्षे यांची प्रकट मुलाखत घेतली त्या वेळी ते बोलत होते. त्यामध्ये त्यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगण्यात आले.

मी गेले १५ वर्षे जात संपविण्यासाठी व्याख्याने देत आहे. मी ब्राह्मण असलो, तरी मला जातीचा गर्व नाही. जात ही संपलीच पाहिजे. त्यापेक्षा मनुष्य धर्म टिकला पाहिजे. जात संपणे अशक्य आहे, पण त्यासाठी प्रयत्न करु नये, असे म्हणून चालणार नाही. कारण कधीतरी जात संपवण्यात कधीतरी यश मिळेल आणि आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल, असेही शरद पोंक्षे म्हणाले.

सध्या जाती जातींमध्ये फार मोठी तेढ निर्माण झाली आहे. मराठा, कुंभार, ब्राह्मण असे विविध जातींचे संघ निर्माण झाले आहेत. हे सर्व संपवायला हवेत, फक्त एकच हिंदू जात राहायला हवी. सध्या मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभ्यास सुरु केला आहे. मला जेवढे सावरकर प्रिय आहेत, तेवढेच मला बाबासाहेब आंबेडकर देखील प्रिय असल्याचे शरद पोंक्षे यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्र अधोगतीकडे जातोय हे पाहून वाईट वाटतं. माणुसकी धर्माची माणसं कधी बनणार? Secularism आपल्याला कळलंय का? Secularism मुळे धर्मच गायब होतो. कोणता Secular पक्ष आहे महाराष्ट्रात? काम करताना धर्म, धर्माचा शब्द येता कामा नये.  राज्यकर्त्यांना हे परवडणारे नाही. विविध समाजाच्या मतपेट्या बनवल्या गेल्या आहेत असेही ते म्हणाले.

शरद पोंक्षे हे गेल्या काही दिवसांपासून ‘हे राम,नथुराम’ या नाटकामुळे चर्चेत आहे. पण गांधी विचारांना धक्का लावणारे हे नाटक आहे, अशी टीका अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांनी हे नाटक करणे थांबवले आहे. मात्र अनेक व्याख्याने आणि चर्चासत्रातून ते त्यांचे विचार मांडताना दिसतात.

दरम्यान, जात हा महाभयंकर रोग आहे, असे तुम्ही म्हणता. मग जातीच्या नावावर तुम्हाला जाहीर झालेला पुरस्कार तुम्ही स्वीकारणार की नाही हे तुम्हीच ठरवा. म्हणजे तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात, हे महाराष्ट्र राज्यातील जनतेला समजेल, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात यांनी म्हटले आहे.