वर्क ऑर्डर थांबविल्याने भ्रष्टाचारी भाजपच्या उधळपट्टी धोरणाला लागला ब्रेक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
- ड्रेनेज विभागातील चुकीच्या निविदाप्रक्रियेची होणार तपासणी
पिंपरी-चिंचवड, दि. 7 मे - अमृत योजनेअंतर्गंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतनिधीतून महानगरपालिकेने ड्रेनेज विभागातील सुधारणेसाठी १४८ कोटींचे काम काढले. गेल्या पाच वर्षाच्या काळात सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी आणि अपारदर्शी कारभारामुळे अमृत योजनेतील हे काम बारगळले. त्यामुळे पुन्हा याच कामासाठी आणखी १२२ कोटी रुपयांची निविदा काढून भाजपने सत्तेतून पायउतार होताना ते मंजूर केले. राष्ट्रवादी काँग्रेसने या कामातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यामुळे भाजपचा हा कोट्यवधीचा लुटीचा डाव फसणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.
या संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अटल मिशन योजनेअंतर्गंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने १४८ कोटी रुपयांची काम पिंपरी चिंचवड शहरात जुन्या सांडपाणी नलिका काढून तेथे नवी नलिका टाकणे आणि चिखली, बोपखेल आणि पिंपळे निलख येथे तीन एसटीपी प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. पिपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता मिळाल्यानंतर पारदर्शक कारभाराचा बोलबाला करत पहिल्या वर्षी सत्ताधा-यांनी याची निविदा काढली होती. तर हे काम २०१८ मध्ये प्रत्यक्षात सुरू झाले होते. तेव्हापासून दरवर्षी १२ महिने शहरात खोदाई चालू असताना मुदतीत हे काम पूर्ण करता आलेले नाही. या कामावर सव्वाशे कोटींहून अधिक खर्च झालेला असताना काम अर्धवट स्थितीत असताना महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाने ते बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर आणखी १२२ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. चुकीच्या पध्दतीने हे काम काढण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत सत्तेतून पायउतार होताना सत्ताधा-यांनी या कामाला मान्यता देखील दिली. या कामाच्या संदर्भात या आधीच्या निविदेत प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला होता. एकाच कामासाठी दोन वेळा निविदा काढून, तसेच सल्लागार, कंत्राटदारांवर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करून महानगरपालिका तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा सगळा प्रयत्न असून यातील त्रुटी राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात आणून दिल्या होत्या.
भाजपने घाई-गडबडीत कामाला मान्यता दिली. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे या कामासंदर्भात तक्रारी पोहोचल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने या कामाला वर्क ऑर्डर देणे टाळले आहे. या संपूर्ण कामाची तपासणी होणार आहे. तपासणीनंतर पुढील कार्यवाही होणार असल्यामुळे भाजपच्या लुटीच्या धोरणाला ब्रेक लागला आहे, असे वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.