ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - केंद्र सरकारकडून 'दादासाहेब फाळके पुरस्कार २०२०' जाहीर करण्यात आला असून, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबत घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख ठरल्या आहेत. यापूर्वी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची निवड करण्यात आली आहे.

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळ्याचे रविवारी (20 फेब्रुवारी) मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला आशा पारेख, लारा दत्ता, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, अहान शेट्टी, सान्या मल्होत्रा आणि रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेत्री क्रिती सेननला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता रणवीर सिंहला देखील 83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

60-70 च्या दशकात आशा पारेख या केवळ चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. तेव्हाच्या काळात आशा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. १९५९ ते १९७३ या काळात आशा पारेख बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री राहिल्या आहेत. अभिनेत्री आशा पारेख यांनी ‘माँ’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आशा पारेख भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. आशा पारेख यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट ‘दिल दे के देखो’ होता. हा चित्रपट यशस्वी झाला. सुमारे ८० चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या आशा पारेख यांचे सर्व चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले. ज्यात 'तिसरी मंझिल', 'दिल देके देखो', 'कटी पतंग', 'प्यार का मौसम', 'मेरा गाव मेरा देश', 'कारवॉं' अशा अनेक एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमुळे ओळखल्या जातात. त्यांनी राजेश खन्ना, शम्मी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा अनेक बड्या स्टार्ससोबत काम केलं आहे. तसंच केवळ हिंदी नाही तर गुजराती, पंजाबी, कन्नड सिनेमांतूनही त्यांनी अभिनय केला आहे.

दादासाहेब फाळके पुरस्काराची यादी -

सर्वोत्कृष्ट चित्रपट- शेरशाह

सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंह

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कृति सेनन

सर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टी

फिल्म ऑफ द इयर- पुष्पा द राइज

सर्वोत्कृष्ट वेब सीरीज- कँडी

सर्वोत्कृष्ट अभिनेता (वेब सीरीज)- मनोज बाजपेयी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वेब सीरीज)- रवीना टंडन

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- विशाल मिश्रा

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूर

सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म- पाउली

बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म- अनादर राउंड

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- केन घोष

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- जयाकृष्ण गुममड़ी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सतीश कौशिक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लारा दत्ता

सर्वोत्कृष्ट खलनायक- आयुष शर्मा

पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता- अभिमन्यु दासानी

पीपल्स च्वाइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राधिका मदान

टेलिविजन सीरियल ऑफ द इयर- अनुपमा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- शाहीर शेख

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- श्रद्धा आर्या

मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर टिव्ही सीरियल- धीरज धूपर

मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्ट्रेस टिव्ही सीरियल- रुपाली गांगुली

क्रिटिक बेस्ट फिल्म- सरदार उधम

क्रिटिक बेस्ट अॅक्टर- सिद्धार्थ मल्होत्रा

क्रिटिक बेस्ट अॅक्ट्रेस- कियारा आडवाणी