काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप एकत्र
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
भोर, दि. ३० एप्रिल – महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची भाजप सोबत राज्यात लढाई चालू आहे. अगदी टोकापर्यंत गेलेली ही लढाई आपण दररोज पाहतो, वाचतो. परंतु काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप हे एकत्र आले आहेत हे सांगूनही कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु असे घडले आहे. त्याचे असे झाले की, भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. या कारखान्यावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. पण त्याला सुरूंग लावायला आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपने एकत्र येत ठरविले आहे. एकूणच काय राजकारणात कायम स्वरूपी कोणी कोणाचा शत्रू नसतो किंवा मित्र हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या निवडणुकीसाठी आतापर्यंत 45 इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून 29, राष्ट्रवादी व शिवसेना मिळून 13, तर भाजपकडून ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. हे पाहता काँग्रेस पक्षाच्या पॅनल विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी-शिवसेनेने भाजपशी युती केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी-शिवसेने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. कारखाना निवडणुकीत 6 गटांतून 17 संचालक निवडून द्यायचे आहेत. दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी 2 मे रोजी होणार आहे. पात्र उमेदवारांची यादी 4 मे रोजी जाहिर होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 5 मे ते 18 मे असून निवडणुक चिन्हांचे वाटप उमेदवारांना 19 मे रोजी केले जाणार असल्याची माहिती आहे. या निवडणुकीसाठी 29 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.