चिनकडून अमेरिकी बंदर उद्ध्वस्त केले जाण्याची शक्यता

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चिनकडून अमेरिकी बंदर उद्ध्वस्त केले जाण्याची शक्यता


चीन - चीनने अज्ञात ठिकाणच्या पाण्यात एका घाटाला उडवले. त्यात हे ठिकाण उद्ध्वस्त झाले. अशा प्रकारचे हे पहिले परीक्षण आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या म्हणण्यानुसार युद्धाच्या परिस्थितीत शत्रूच्या पुरवठा मार्गाला उद्ध्वस्त करण्यासाठी या तंत्रज्ञानाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. युद्धात अशा तंत्रज्ञानाचा वापर अमेरिकेच्या विरोधातदेखील केला जाऊ शकतो.

प्रशांत क्षेत्रात अमेरिकेने बदललेल्या रणनीतीच्या विरोधात पाण्यात स्फोट घडवून आम्ही विरोध दर्शवला आहे, असे चीनच्या वृत्तपत्राने म्हटले आहे. अमेरिका सैन्याला एकाच ठिकाणी तैनात न करता लहान ठिकाणांवर पाठवून विभागत आहे. त्यामुळे संभाव्य हल्ल्यांपासून बचाव शक्य होऊ शकेल, असा दावा करण्यात आला. त्यातच आता चीनने अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा विकास सुरू केला आहे. पाण्याखाली स्फोट घडवून हल्ला घडवून आणता येऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेची जहाजे कमकुवत होतील. गेल्या आठवड्यात चीनने उपग्रह सोडले. त्याद्वारे इतर अंतराळ यानांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्याच्या सेन्सरचा वापर माहितीच्या संकलनासाठी केला जाऊ शकतो. त्याचा युद्धात वापर शत्रूच्या बंदरांना नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो.

अंतराळातील कचरा दूर करण्यासाठी उपग्रह सोडले : एक तज्ज्ञ म्हणाले, बंदरे व घाट नष्ट झाल्यानंतर शत्रूची रसद बंद पडेल आणि सैन्याला इतरत्र तैनात करण्याची रणनीती व्यर्थ ठरेल. चीनने अलीकडेच शिजियान २१ नावाने एका उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. अशा स्थितीत पाण्यातील स्फोटाच्या तंत्रज्ञानाची ही चाचणी घेण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान अंतराळातील कचऱ्याची साफसफाई करेल, असे चीनचे म्हणणे आहे. परंतु या तंत्रज्ञानाच्या साह्याने इतर उपग्रहांना पकडणे व पाडण्याच्या कुरापती केल्या जाऊ शकतात, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. चीनने याआधी शिजियनचे १७ रोजी प्रक्षेपण केले होते. ही मोहीम २०१६ मध्ये राबवण्यात आली होती.