कृष्णप्रकाश यांची मुदतपूर्व बदली राजकीय हेतूने; सामाजिक संघटनांचा आरोप
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त श्री. कृष्णप्रकाश यांची राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेली मुदतपूर्व बदली ही चुकीची व अन्यायकारक असून, ती केवळ आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चा तसेच कष्टकरी कामगार पंचायत, भीमशाही युवा संघटना व पिंपरी चिंचवड शहरातील नागरी संघटनांनी सदर बदली आदेशाचा निषेध व्यक्त करून कृष्णप्रकाश यांचा पोलीस आयुक्त म्हणून निर्धारित असलेला संपूर्ण कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करण्यात येऊ नये अशी लेखी विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे तसेच पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आलेली आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या वेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, कष्टकरी कामगार पंचायतीचे बाबा कांबळे, भीमशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे उपस्थित होते.
मा. कृष्णप्रकाश यांनी पोलीस आयुक्त पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर पिंपरी - चिंचवड शहरातील संघटीत गुन्हेगारी तसेच अवैद्य धंदे आणि लँड माफीया यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच नागरिक तक्रारींना प्राधान्य देण्यासाठी आजपर्यंत त्यांच्या कालखंडात त्यांनी दहा हजार पेक्षा जास्त नागरिकांची समक्ष भेट घेवून त्यांच्या तकारी सोडविण्याचा विक्रमही केला आहे.
त्यांनी नागरिकांसाठी त्यांचा खासगी मोबाईल नंबर २४ तास उपलब्ध करून दिला होता व त्याद्वारे समस्यांचे निराकरण करीत होते. विशेषत: महिला वर्गामध्ये त्यांच्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे ते पिंपरी -चिंचवड शहरातील नागरिकांचे अत्यंत आदरणीय अधिकारी ठरले.
शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर जबर कारवाई करीत असतानाच सर्व सामान्य नागरिक व स्वंयसेवी संस्थाच्या समाजाभिमुक कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजेरी लावत त्यांनी सोशल पोलिसींगचा सुयोग्य वापर करीत पोलीस व नागरिक यांच्यामधील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
संघटीत गुन्हेगारी संपविण्यासाठी त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कालावधीत तब्बल ५० पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोक्का, एम.पी.डी.ए., तसेच तडीपारी सारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाई पहिल्यांदाच मोठया प्रमाणात कोणत्याही दबावाला न जुमानता करण्यात आलेल्या आहेत.
श्री. कृष्णप्रकाश यांनी झोपडपट्टीतील मुलांना विशेषतः विधी संघर्षीत बाल गुन्हेगार यांना गुन्हेगारी क्षेत्रातून परावृत्त करून त्यांचे योग्य पुर्नवसानासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सन्मानाची व आपुलकीची भावना वाढत असतानाच शहरातील राजकीय नेते मात्र त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कोणत्याही क्षणी होणारी निवडणूक लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या निपक्षः कारवाईचा आपल्याला फटाका बसू नये म्हणून श्री. कृष्ण प्रकाश साहेब यांची पिंपरी-चिंचवड़ आयुक्त या पदावरून मुदतपूर्व बदली करण्यात आलेली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या मधील नागरिकांचे जनमत हे श्री. कृष्णप्रकाश यांची बदली रद्द होण्याच्या बाजूचे असून, सरकारने त्याचा सन्मान करीत कृष्णप्रकाश यांना पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी -चिंचवडचा आयुक्त पदाचा निर्धारित कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये अशी विनंती सदर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा मागणी राज्य सरकार यांना करीत आहोत असे पत्रकात म्हटले आहे.