केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, - केंद्रातील मोदी सरकारच्या आशिर्वादामुळे गौतम अदानी हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती ठरले होते. हिंडेनबर्ग कंपनीने अदानी उद्योग समूहाची पोलखोल केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. जनतेचा पैसा धोक्यात असतानाही मोदी सरकार उद्योगपती मित्रासोबत आहे. सेबी सारख्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाही मोदी सरकार याबाबत अदानींना क्लीनचीट देत आहे. निवडणूकीत दिलेले आश्वासन ते विसरले असून मोदी सरकारचा हात आम आदमी के साथ नसून ठराविक उद्योगपतींच्या साथ आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली.
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गौरव चौधरी, सरचिटणीस विशाल कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.