मानलेल्या मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार

मानलेल्या मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार

पिंपरी-चिंचवड, दि. १९ एप्रिल – मामा आणि भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. मानलेल्या मामाने 14 वर्षाच्या अल्पवयीन भाचीवर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तेजस सुरेश अहिवळे (वय 25) याच्यावर IPC 376, 376 (2) (एन), 506 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. 

याबाबत पीडीत तरुणीच्या आईने (वय 35) सोमवारी (दि.18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तेजस अहिवळे (वय 25 रा. थेरगाव, पुणे) याला अटक केली आहे. हा प्रकार 5 ते 6 महिन्यापासून ते अद्यापपर्यंत फिर्यादी यांच्या घरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मानलेला भाऊ आहे. त्यामुळे त्याचे फिर्यादी यांच्या घरी येणे-जाणे होते.

आरोपीने फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्यासोबत वारंवार शरीर संबंध प्रस्थापीत केले. तसेच याबाबत घरात कोणाला सांगितले तर आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. आरोपीच्या धमकीला

घाबरून मुलीने याबाबत कोणाकडे वाच्यता केली नाही. मात्र, पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.