महागाईचा भडका उडणार ; जीएसटीची प्रणाली केंद्र सरकार बदलणार ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महागाईचा भडका उडणार ; जीएसटीची प्रणाली केंद्र सरकार बदलणार ?

नवी दिल्ली, दि. 7 मार्च – मोदी सरकार आता जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. नव्या बदलानुसार जीएसटीचा सर्वात कमी स्लॅब 5 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. तसेच जीएसटी प्रणालीतील काही सवलतींची यादी देखील कमी करण्यात येणार असल्याचं समजतंय.

राज्यांच्या अर्थमंत्र्यांची समिती या महिन्याच्या अखेरीस आपला अहवाल जीएसटी परिषदेला सादर करू शकते. या मध्ये सरकारचा महसूल वाढविण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचविण्यात आले आहेत. या मध्ये जीएसटी स्लॅब वाढवण्याच्या मागणीचा देखील समावेश आहे. जर खरंच ही मागणी मान्य झाली तर महागाईचा वारू उधळणार हे नक्की.

जीएसटी चा स्लॅब पाच टक्क्यांवर आणल्यास महसुलात मोठी वाढ होईल. त्यामुळे सरकारला दीड लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक महसूल मिळू शकतो. एक टक्का जरी वाढ केली तरी वर्षाला 50 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. यात प्रामुख्याने पॅक केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश होतो. यात खाद्यपदार्थ, साखर मसाल्याचे पदार्थ, कोळसा, चहा, अगरबत्ती, सुकामेवा, मिठाई यांचा समावेश असेल.

अर्थव्यवस्था अद्यापही कोरोना संकटातून बाहेर आलेली नाहीये. महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत आहे. इंधनापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. त्यातच आता जीएसटीची प्रणाली बदलली तर महागाईचा आगडोंब उसळेल. सर्वसामान्य विशेषतः महिलांचे महिन्याचे बजेटच कोसळून पडेल.