आगरकर, अण्णा भाऊंच्या विवेकवादाची समाजाला गरज - डॉ. श्रीपाल सबनीस

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आगरकर, अण्णा भाऊंच्या विवेकवादाची समाजाला गरज -  डॉ. श्रीपाल सबनीस

डॉ. श्रीपाल सबनीस : डॉ. धनंजय भिसे यांच्या अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, (प्रबोधन न्यूज ) -  महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. अशा काळात आद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर ांच्या तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विवेकवादाची, बुद्धिप्रामाण्यवादाची समाजाला आत्यंतिक गरज आहे, असे आग्रही मत मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. आगरकर यांची अभिजन  बहुजन अशा दोन्ही समाजाकडून उपेक्षाच झाली, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

मातंग साहित्य परिषदेतर्फे आद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. 17) भावे हायस्कूल येथील भारतीय विचार साधना सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. धनंजय भिसे यांच्या ‌‘अण्ण  भाऊ साठे लिखित ‌‘माझा रशियाचा प्रवास' : एक आकलन' या पुस्तकाचे प्रकाशन समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते झाले. त्या व्ोळी डॉ. सबनीस बोलत होते. उपायुक्त कदम पाटील, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. पी. डी. साबळे, डॉ. देविसाद वायदंडे, डॉ. संदीपान झोंबाडे, राजाराम अस्वरे, यशोदीप पब्लिकेशन्सच्या रुपाली अवचरे आदी उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, महाराष्ट्राच्या बुद्धीप्रामाण्यवादाच्या इतिहासात आगरकर यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. आगरकर कृतिशील सुधारक होते. आपल्या लेखनाद्वारे त्यांनी समाजातील संकुचितपणावर, सोवळेपणावर कोरड ओढले. मात्र, त्यांच्या सुधारणावादाचे आज कुणालाच स्मरण होत नाही, हे दुर्दैवी आहे. आगरकर  आंबेडकर यांच्यात बुद्धीप्रामाण्य हाच समान धागा आहे. खरे तर आगरकर यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे आंबेडकर होय.

अण्णा भाऊ साठे यांचे विचारही आगरकर यांच्याप्रमाणे व्यापक होते. कथा, कादंबऱ्या, पोवाडे असे विपुल साहित्य लिहिणारे अण्णा भाऊ हे क्रांतिकारक शाहीर होते. मुख्य म्हणजे त्याच्या शाहिरीत जागतिक संदर्भ येतात. त्या अर्थी त्यांचे विचार हे विश्वात्मक ठरतात.

ज्ञानसंपादनातूनच समाजाची प्रगती : नारनवरे

नारनवरे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांच्या ‌‘रशियाचा प्रवास' या पुस्तकावरील हे सर्वसाधारण लेखन नाही, तर संशोधनपर लेखन आहे. त्याचे महत्त्व वेगळे आहे. शोषित, वंचितांबद्दलची कळकळ मनात घेऊन जी माणसे जातीधर्मापलीकडे जाऊन काम करतात, त्याचे मोल मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, रानडे, अण्णा भाऊ साठे यांचे काम विद्रोही होते. ज्ञानसंपादनातूनच समाज पुढे जातो. म्हणून समाजाची प्रगती साधायची असेल तर उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मतही त्यांनी नोंदविले.

डॉ. धनंजय भिसे म्हणाले, आगरकर आणि अण्णा भाऊ साठे दोघेही कायम उपेक्षित राहिले. आगरकर यांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला नाही, हे दुर्दैव आहे. म्हणूनच हे पुस्तक मी त्यांना समर्पित केले आहे. अण्णा भाऊ साठे यांनी अनेक कादंब़ऱ्या लिहिल्या. मात्र, त्यांचीही उपेक्षाच झाली. या दोघांचे विचार समाजापुढे येणे ही काळाची गरज आहे.

प्रास्तविकात अंबादास सकट म्हणाले, व्यापक भूमिका घेऊन पुढे गेले पाहिजे. त्यातूनच राष्ट्रीय एकात्मतेचा विचार अधिक दृढ होणार आहे.