'कोरोना विरुद्धची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकूच' ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठकीत कोविड निर्मूलन निर्धारासोबतच केली विविध समस्यांवर चर्चा
रुग्णांवरील तात्काळ उपचारांसाठी टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देणार
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या कोरोना संकटाशी मुकाबला करताना कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्धची ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच, असा आत्मविश्वास व्यक्त केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांना तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविड संदर्भात आयोजित बैठकीत ठाकरे बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या बैठकीस देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे अशी माहितीदेखील दिली.
- रेमडीसीव्हीर, लस पुरवठा वाढवण्याची मागणी
महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडीसीवीरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा अशी मागणी करून मुख्यमंत्री म्हणाले की ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे. रेमडीसीव्हीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही ते म्हणाले. रेमडीसीव्हीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
- राज्याला ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरची आवश्यकता
महाराष्ट्रात 60 हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. राज्यात 76 300 ऑक्सिजन बेड्स आहेत. 25000 पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राला दररोज 1550 मे टन ऑक्सिजनची आवश्यकता
300 ते 350 मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल.
सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 250 ते 300 मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे. आपण रेल्वे मागाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता. केंद्र शासनाकडे १३,००० जम्बो सिलेंडर व सुमारे अकराशे व्हेंटीलेटर्स मागणी केली असल्याचे ठाकरे म्हणाले.
- रेमडेसिव्हीर परदेशातून आयात करण्याची परवानगी द्यावी
रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिव्हीरमुळे कमी होतो. परिणामी ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज 70 हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज 27 हजार व्हायल्सचे वाटप रेमडेसिव्हीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. परदेशातून रेमडेसिव्हीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
- लसीकरण वाढविण्यासाठी शाश्वत व नियमित लसी द्या
राज्याला लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे. काल २२ एप्रिल रोजी सकाळी आपल्याकडे ६.५ लाख डोस उपलब्ध होते. त्यापैकी दिवसभरात ३.५ लक्ष डोस वापरण्यात आले. तसेच २ लाख लसींचा पुरवठा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला. आज यावेळी राज्यात सुमारे ५ लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य लसीकरणात संपूर्ण देशात नंबर एकचे राज्य आहे. त्यामुळे राज्याला शाश्वत व नियमित लसींचा पुरवठा होणे आवश्यक. लसीच्या एकूण उत्पादनापैकी 50 टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे, अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
- विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक
राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
- कोविड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार
आम्ही उद्योजक, कामगार तसेच इतरांशी सातत्याने बोलत असून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. यात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याबरोबर, कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक असल्याचे आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले.