कोरोना नंतर येऊ शकतो हार्ट अटॅक ! बचावासाठी करा 'या' टिप्सचा अवलंब !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - कोरोना हा एक फुफ्फुसाचा आजार असल्याचा विचार आपण करतो, कारण यामध्ये अनेकांना धाप लागतो किंवा श्वास घेताना त्रास होतो. परंतु, एका संशोधनानुसार कोरोनानंतर हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. नुकतेच लोकप्रिय टीव्ही अँकर रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
संशोधकांच्या अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की, कोरोनातून बरे झालेल्या बर्याच जणांच्या हृदयाला देखील हानी पोहचलेली असते, विषाणूच्या हल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील निर्माण होतो. काहीना ही लक्षणे सौम्य वाटतात, त्यामुळे असे लोक रुग्णालयात जाणे टाळतात.
एका जर्मन अभ्यासानुसार, कोरोनामुळे 76 % लोकांच्या हृदयाचे नुकसान हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांइतकेच झाल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनातून बरे झालेल्या 60 टक्के लोकांमध्ये हृदयाच्या स्नायूमध्ये सतत होणारी जळजळ देखील दिसून आली. संशोधकांनी असे म्हटले आहे की, या जळजळीमुळे हृदयाला नुकसान होऊ शकते.
इतर संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते किंवा काही लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
जे लोक 65 किंवा त्याहून अधिक वयाचे किंवा दीर्घकालीन आजारांनी पिडीत आहेत, त्यांना कोरोना संसर्गामुळे हृदयाच्या गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असू शकतो, परंतु त्यापेक्षा कमी वयाने निरोगी लोकही यामुळे बाधित होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला छातीत दुखणे, श्वास लागणे, हृदयाची धडधड होणे किंवा सुजलेल्या घोट्या यासारखी चिंताजनक लक्षणे दिसली, तर त्वरित आपल्या डॉक्टरांना कॉल करा.
कोरोना काळात इमर्जन्सी वॉर्डमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात येण्याच्या भीतीने काही लोक आपातकालीन वेळेतही रूग्णालयात जाणे टाळतात. जर आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसत असतील, तर त्वरीत रूग्णालयात जाणे आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
हृदयाचा ठोका कमी/जास्त, हाताला किंवा टाचेला सूज येणे, घाम येणे, खांदा दुखणे, जबडा, दात किंवा डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, छातीत जळजळ किंवा अपचन अशी लक्षणे दिसत असल्यास आणि आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे, असे आपल्याला वाटत असल्यास, लगेचच आपल्या डॉक्टरांना कॉल करा.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तुम्ही कोरोनामधून बरे झाला असाल तर, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी इएमटी आणि इमर्जन्सी रूममधील डॉक्टरांना हा तपशील सांगावा, असे तज्ञ् सांगतात.