आंतरजिल्हा प्रवासासाठी बंधनकारक असणारा ई-पास  कसा काढायचा ? काय आहेत मार्गदर्शक तत्त्व ?  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आंतरजिल्हा प्रवासासाठी बंधनकारक असणारा ई-पास  कसा काढायचा ? काय आहेत मार्गदर्शक तत्त्व ?  
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा, तसेच अर्ज भरण्यासाठी काय करावे, यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. चला तर, जाणून घेऊयात ई-पास कसा काढायचा?
* ई-पास काढा असा :
ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा. महाराष्ट्राबाहेर जायचं आहे की नाही यावर क्लिक करा.
स्टेप 1: जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा.
स्टेप 2: तुमचे संपूर्ण नाव नोंद करा.
स्टेप 3: प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा.
स्टेप 4: मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा.
स्टेप 5: वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.
स्टेप 6: प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा.
स्टेप 7 : आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा.
स्टेप 8: परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा.
स्टेप 9: 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

* ई-पाससाठी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना :
- शासकीय कर्मचारी/ वैद्यकीय कर्मचारी/ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना केवळ त्यांचे कार्यालयीन कामकाजाच्या प्रवास करण्याकरिता आंतरजिल्हा किंवा आंतर-शहर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही. 
- २१ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार अन्य खासगी व्यक्तींना अत्यंत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांत्सव मुंबई शहराबाहेर अथवा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास प्राप्त करणे बंधनकारक असेल. 
- पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ मुंबई पोलीस आयुक्तालयातील संबंधित परिमंडळीय पोलीस उपआयुक्त कार्यालयाकडे आहे.
- आवश्यक ती कागदपत्र जोडून अर्ज केल्यास अर्जदारास अर्जात नमूद वैध कारणास्तव ई-पास वितरीत करण्यात येईल.
- अत्यावश्यक सेवा/ शासकीय सेवा/ वैद्यकीय सेवांशी संबंधित असलेल्या व्यक्तींना कार्यालयीन कामकाजाच्या प्रवासाकरिता ई पास आवश्यक नाही. त्यांना ओळखपत्रांच्या आधारे प्रवासाची मुभा देण्यात येईल.
- मुंबई शहरात प्रवास करण्यास, अत्यावश्यक आणि शासनाने सूट दिलेल्या कारणांसाठी ई-पासची आवश्यकता नाही.
- सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
- अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्र एका फाईलमध्ये एकत्र करा
- फोटोची साईझ 200 केबीपेक्षा जास्त नसावी आणि संबंधित दस्ताऐवजांची साईज ही 1 MB पेक्षा जास्त नसावी
- अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा. 
- संबंधित विभागाकडून अर्ज पडताळणी आणि मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही नमूद टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करु शकता.
- ई-पासमध्ये तुमचे वाहन क्रमांक, ई-पासची वैधता आणि क्यूआर कोड असा तपशील असेल.
- प्रवास करताना आपल्याकडे ई-पासची सॉफ्ट कॉपी/ हार्ड कॉपी सोबत ठेवा आणि पोलिसांनी विचारले असता त्यांना आपला ई-पास दाखवा किंवा तुम्ही तो प्रिंट करुन वाहनावर चिकटवू शकता.
- ई-पासची डुप्लीकेट प्रत बनवणे. तसेच वैध तारखेनंतर किंवा अधिकृत परवानगीशिवाय त्याचा वापर करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे हा दंडनीय गुन्हा आहे.