ताज्या बातम्या
राज्यातील जनतेसाठी तब्बल साडेपाच हजार कोटींचे पॅकेज
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरिब जनतेचा विचार करत त्यांच्यासाठी तब्बल ५ हजार ४७६ कोटींचे आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे.
महाराष्ट्रात बुधवारपासून पुन्हा लॉकडाऊन
महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन
राज्यात लॉकडाउन लागण्याची शक्यता बळावत चालली आहे. वाढत्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाउनबाबत चाचपणी सुरू असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतलं आहे
लॉकडाउनला पुणेकरांचा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचाच विरोध; पण… -अजित पवार
आधीच म्हणालो होतो, कडक भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका
IPLपूर्वी करोनाचा कहर, RCBच्या खेळाडूला झाली लागण
आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आता तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
चिंता वाढली! २४ तासांत ९३ हजार नवीन रुग्ण; ५१३ जणांचा मृत्यू
करोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस चिंतेत भर टाकू लागली आहे. फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर २४ तासांच्या कालावधीत पाचशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन
मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती.