सायबर चोरट्यांकडून महापालिका आयुक्तांच्या प्रोफाईलचा वापर; आर्थिक मदतीची मागणी 

सायबर चोरट्यांकडून महापालिका आयुक्तांच्या प्रोफाईलचा वापर; आर्थिक मदतीची मागणी 

पिंपरी- 

सायबर चोरट्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या  फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करुन ऑनलाईन चॅटींग केल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर चोरट्यांनी या प्रोफाईल वापर करत नागरिकांची फसवणूक केल्याचे ही समोर आले आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या  फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर केला जातोय. याबाबत सायबर पोलिसात तक्रर देण्यात आली आहे. चोरट्यांकडून मोबाईल क्र. 7524891151 या नंबरवरुन व्हॉटस्अपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग केली जात आहेत. तसेच त्यांच्याकडे आर्थिक मदतीची विचारणा केली आहे. याबाबत महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी पोलीस खात्याशी संबंधित सायबर सेल कडे फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार नोंदविली आहे.  मोबाईल क्र. 7977510080 ( या क्रमांकावरुनही व्हॉटस्अपच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे.