नागरिक आणि महापालिका यांच्या समन्वयातून ऑक्सिजन पार्कची उभारणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नागरिक आणि महापालिका यांच्या समन्वयातून ऑक्सिजन पार्कची उभारणी

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६ आकुर्डी दूरध्वनी केंद्रासमोर उभारण्यात आलेले ऑक्सिजन पार्क म्हणजे पर्यावरणाविषयी जागरूक नागरिक आणि पिंपरी - चिंचवड महापालिका यांच्यातील समन्वयाचा उत्तम वस्तुपाठ म्हणता येईल असे मत उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी व्यक्त केले.

२०१८ सालापासून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ऑक्सिजन पार्क रेसिडेन्स असोसिएशन ही सेवाभावी संस्था यांनी आकुर्डी दूरध्वनी केंद्रासमोर असलेला ०.६१ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड महानगरपालिकेत हस्तांतरित करण्यात यावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला होता.

 पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून आज सकाळी या नियोजित ऑक्सिजन पार्कमध्ये सुमारे २१६ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षारोपणास माजी उपमहापौर शैलजा मोरे,राजू मिसाळ,माजी नगरसेविक अमित गावडे,माजी नगरसदस्या शर्मिला बाबर, सह उद्यान अधीक्षक राजेश वसावे, उद्यान पर्यावेक्षक संदीप गायकवाड,  सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, पर्यावरणप्रेमी धनंजय शेडबाळे, ऑक्सिजन पार्क रेसिडेन्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय नाईक, उपाध्यक्ष जयकुमार गुजर, सचिव धनंजय कदम, सदस्य सोनलकुमार सिंगी, विश्वजित हरूगडे, प्रशांत शेजवळ, हनुमंत रेडकर, देवेंद्र खडसे, संतोष मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शहरीकरणामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे या उद्देशाने परिसरातील विविध गृहरचना संस्थांमधील जागरूक नागरिक एकत्र आले होते. त्यांनी नाशिक आणि अन्य ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन पार्कांना भेटी देऊन, अभ्यास करून महापालिकेकडे अशा प्रकल्पाची मागणी केली होती. त्याला स्थानिक नगरसदस्यांनी आणि  महापालिका आयुक्त, उपायुक्त यांच्यासह सर्वांनी सहकार्य केल्यामुळे एक आदर्श प्रकल्प कार्यान्वित झाल्याची भावना उपस्थिती नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.