नैराश्यातून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नैराश्यातून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास 
पुणे -
एमपीएससीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात घडली आहे. काल रात्री सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. अमर मोहिते असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून तो स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात राहत होता. सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये राहून अमर स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता. कोरोनामुळे आधीच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यात मराठा आरक्षणही रद्द झाल्यामुळे केवळ एका गुणासाठी अमर पीएसआयच्या शारिरीक परिक्षेतून बाहेर पडला होता. यामुळे अमर मानसिक तणावात होता. याच नैराश्येतून अमरने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

पुण्यात सहा महिन्यांपूर्वी एमपीएससीची परीक्षा पास होऊन दीड वर्ष उलटूनही नोकरी न मिळाल्याने स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेत जीवन संपवले होते. स्वप्निल एमपीएससीची पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र त्यानंतरही दोन वर्ष मुलाखतीला कॉल आला नाही. स्वप्निलच्या घरची हलाखीची परिस्थिती आणि त्यात शिक्षणासाठी घेतलेले कर्ज यामुळे मानसिक तणावातून त्याने आत्महत्या केली होती.